Share

Chitra Wagh । चित्रा वाघ यांनी आयुक्तांवरील दबावाचे आरोप फेटाळले, ठाकरे गटाच्या टीकेला सडेतोड उत्तर

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढ झाली होती. या निवडणुकीसाठी लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर केली. मात्र त्या शासकीय कर्मचारी असल्याने महानगर पाकिकेने त्यांचा राजीनामा अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर ऋतुजा लटके यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने आज निर्णय जाहीर केला. तर दुसरीकडे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळू नये यासाठी शिंदे, फडणवीस सरकारने महापालिका आयुक्तांवर दबाव आणल्याचा आरोप शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केला जात आहे. यावर लटके यांच्या राजीनाम्याबाबत महापालिका आयुक्तांवर कसलाही दबाव नसल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी स्वत:च स्पष्ट केलं आहे. त्यांनी आपल्यावर कोणताही राजकीय दबाव नसल्याचं म्हटलं आहे. राजीनाम्याची जी तीस दिवसांची प्रक्रिया असते ती प्रक्रिया आयुक्त सध्या फॉलो करत असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

मुंबई हायकोर्टाचा निर्णय-

उमेदवारी जाहीर झालेल्या ऋतुजा लटके यांच्या मुंबई महानगरपालिकेविरोधातील याचिकेवर गुरुवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती नितीन जमादार यांच्या खंडपीठाने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना उत्तर देण्यासाठी तासाभराचा अवधी दिला होता. यावर निर्णय झाला असून ऋतुजा लटके यांचा जमीन मंजूर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढ झाली होती. या निवडणुकीसाठी लटके यांच्या पत्नी ऋतुजा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now