राष्ट्रवादीतून आलेल्या चित्रा वाघ यांना भाजपमध्ये मिळाले मोठे पद

टीम महाराष्ट्र देशा:-भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांना मोठी पदे दिली आहेत. कोल्हापूरचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय महाडिक यांची कोल्हापूर प्रदेश उपाध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ यांची भाजपच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज  गुरुवारी खालील संघटनात्मक नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये धनंजय महाडिक (कोल्हापूर), शेखर इनामदार (सांगली) आणि चित्रा वाघ (मुंबई) यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या मुंबई महिला अध्यक्ष होत्या. विविध कार्यक्रमांमध्ये त्या पक्षाची भूमिका मांडायच्या. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक बडे नेते, पदाधिकारी यांनी अलीकडे भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आजच्या नियुक्त्यांवरुन त्यांना मोठी पदे मिळाल्याचेही दिसत आहे.