‘सुधीरभाऊ म्हणजे पक्षभेद न बाळगता महिलांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्याला प्राधान्य देणारा नेता’

blank

टीम महाराष्ट्र देशा – सुधीरभाऊ म्हणजे पक्षभेद न बाळगता महिलांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्याला प्राधान्य देणारा नेता आहे. महिलांचे प्रश्न घेवून जेव्हाही आपण सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे गेलो तेव्हा त्यांनी प्राधान्याने त्या प्रश्नांची सोडवणुक केली. प्रश्न घेवून आलेली महिला कोणत्या पक्षाची आहे हे न बघता त्या समस्येचे गांभीर्य काय आहे हे ओळखुन समस्येची सोडवणुक करण्यासाठी तात्काळ अधिकायांना निर्देश दिल्याची मी साक्षीदार आहे असं महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

दिनांक 14 सप्टेंबर रोजी मुल शहरात आयोजित महिलांच्या विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मंचावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या गुरनुले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. रेणुका दुधे, मुलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, पंचायत समिती मुलच्या सभापती पुजा डोहणे, जिल्हा परिषद सदस्य शितल बांबोळे, रोशनी खान, वैशाली बुध्दलवार, वनिता आसुटकर आदी महिला पदाधिकायांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

मोदींजींच्या नेतत्वातील केंद्र सरकारने व आपल्या राज्य सरकारने महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहे. महिलांना सन्मान देत त्यांना रोजगार व स्वयंम रोजगाराच्या वाटा उपलब्ध करणारे सरकार हे आपले सरकार असल्याचे देखील चित्रा वाघ यावेळी बोलताना म्हणाल्या.

यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले,पतंप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात नारी सें नारायणी ही संकल्पना राबवत महिलांच्या कल्याणासाठी विविध् योजना अमलात आणल्या. गेल्या 5 वर्षात राज्य सरकारने सुध्दा माझी कन्या भाग्यश्री योजना, ग्रामीण भागातील अंगणवाडया आदर्श करण्याचा निर्णय, अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या मानधनात तसेच भाऊबिज भेट रकमेत वाढ करण्याचा निर्णय, महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंच्या विक्रीसाठी जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर बाजारपेठ निर्माण करण्याचा निर्णय, बचत गटाची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी नवतेजस्विनी, प्रज्वला अशा योजनांसह विविध योजना महिलांच्या कल्याणासाठी राबविल्या आहेत. माझया बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात 15 गावांमध्ये स्व. सुषमा स्वराज महिला उदयोग भवन बांधण्यासाठी प्रत्येकी 60 लक्ष रू. निधी मंजुर करण्यात आला आहे. या माध्यमातुन महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्याचा आपला प्रयत्न आहे. महिलांच्या कल्याणासाठी, त्यांना सक्ष्म व आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांचा हा भाऊ वचनबध्द असल्याचे प्रतिपादन मुनगंटीवार यांनी केले.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, नारी शक्तीचा सन्मान व आदर करत महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहेात. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या योजनांच्या लाभार्थी असलेल्या विधवा, घटस्फोटीता, दिव्यांग, परित्यक्ता महिलांना मिळणारे अनुदान 600 रू. वरून रू. 1000 करण्याचा निर्णय आपण घेतला. विधवा, घटस्फोटीता भगिनींना स्वावलंबी व स्वयंपुर्ण बनविण्यासाठी स्वयंरोजगाराची योजना तयार करण्यासाठी 200 कोटी रूपयांची तरतुद आपण केली आहे. नव्याने शासन सेवेत रूजु झालेल्या महिलांना प्रसुती रजा देण्याचा निर्णय तसेच महिलेने पुनर्विवाह केल्यास मयत पतीची पेन्शन तिला लागु करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. 8 व्या वर्गातील मुलींना मानव विकासच्या माध्यमातुन आपण सायकली सुध्दा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.