मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर इतर आमदारांनीही शिवसेनेला मोठा धक्का देत शिंदे गटात शामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. याचा शिवसेनेला तसेच महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेकडून या आमदारांना परत येण्याचे आवाहन केले जात असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनीही या बंडखोर आमदारांच्या पत्नींना भावनिक साद घालत आवाहन केले आहे. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी टोला लगावला आहे.
“अमृता वहिनींनी केलेली एकही पोस्ट सहन न होऊन त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी करणारे शेणकिडे आता रश्मी वहिनींच्या पडद्यामागून लढाई करणार तर….”, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.
काय म्हणाल्या रश्मी ठाकरे?
रश्मी ठाकरे यांनी पुढाकार घेत बंडखोरांच्या पत्नींना भावनिक आवाहन करत परत या असे म्हटले आहे. त्यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन केला. आपण राजकीय पक्ष म्हणून नाही तर आजवर परिवार म्हणून एकत्र होतो, इथून पुढेही राहू. असे रश्मी ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Chitra Wagh : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालवणारे…”, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला
- Chandrakant Khaire : सेनाभवनातील बैठकीनंतर चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रीया
- Shrikant Shinde : शिवसैनिक आक्रमक! खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले
- Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्यापासून भाजपने रोखलं – संजय राऊत
- Deepali Syyed : “शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात येऊन… ” ; दिपाली सय्यद यांची प्रतिक्रिया
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<