Share

Chitra Wagh | “आमची नावं घेऊन त्यांचं दुकान चालत असेल तर…”; चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंना टोला 

Chitra Wagh | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाची सध्या महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. या निमित्ताने उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. सभेदरम्यान सुषमा अंधारे यांनी अनेक नेत्यांची नक्कल केली आहे. त्यांच्या या टीकांना भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

त्या म्हणाल्या, “प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आमची नक्कल करून अंधारे टाळ्या आणि शिट्ट्या मिळवतात. मात्र, मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काय दिवे लावले, हे त्यांनी महाराष्ट्राला सांगावे. त्यांच्या प्रत्येक विधानावर बोललेच पाहिजे, असे काही नाही. त्या त्यांचे काम करत आहेत. आम्ही आमचे काम करत राहू. असे कितीही आडवे आले तरी आम्हाला फरक पडणार नाही. आम्हाला आमची कामे आहेत.”

पुढे त्या म्हणाल्या, “उद्धव ठाकरेंनी बांधावर जाऊन मोठ्या वल्गना केल्या. मात्र त्यांनी काहीही केले नाही. महाराष्ट्रात जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा एनडीआरएफचे निकष शिंदे-फडणवीस सरकारने बदलले. शेतकऱ्यांना तिप्पट नुकसान भरपाई दिलेली आहे.”

“लोकांना लाभ मिळत आहे. लोकांच्या खात्यात पैसे जात आहेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. राज्य, केंद्र सरकार कित्येक योजना राबवत आहे. आता सर्वांनाच शेतकरी आठवत आहे. आता ते शाताच्या बांधावर जात आहेत. सत्तेत असताना अडीच वर्षे ते झोपले होते. तेव्हा यांना कधी बळीराजाची आठवण आली नाही. १४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, तेव्हा हे झोपले होते,” अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Chitra Wagh | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाची सध्या महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. या निमित्ताने उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now