‘त्या’ आमदाराला घेऊन या… त्याचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही : चित्रा वाघ

'त्या' आमदाराला घेऊन या... त्याचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही : चित्रा वाघ

मुंबई : एका बलात्कारी पिडीत महिलेला आपल्या घरी ठेवून त्याबदल्यात भाजपच्या एका आमदाराकडून वसुली करण्याच्या प्रयत्न चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीत असताना केला होता असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांच्या या गंभीर आरोपांवर वाघ यांनी पत्रकार परिषद घेत सडेतोड उत्तर दिले आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर क्गःचन यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले. त्या म्हणाल्या, ‘विद्याताईनी माझ्यावर जे काही आरोप केले आहेत त्याचा मी निषेध करते. त्याबरोबरच त्यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे मी राजकारणातून निवृत्ती घेईल,असेही त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, अजित पवार , सुनील तटकरे , आणि शरद पवार यांना एकच सांगायचं आहे की विद्या चव्हाणाना बोलवून त्यांना त्या केस बद्दल माहिती द्यावी. माझ्या वैयक्तिक आयुष्यावर तुमची टीका झाली अजून तुमची कुठली हौस भागवायची असेल तर सांगा, पण माझ्या कामावरती जर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर चित्रा वाघ कधीही खपवून घेणार नाही.

विद्या चव्हाण यांना माझा इशारा आहे की  कोणता आमदार आरोप करतो आहे ते सांगावे नाही त्याचं थोबाड फोडलं तुमच्या समोर तर नाव चित्रा वाघ सांगणार नाही.अशा तिखट शब्दात चित्रा वाघ यांनी चव्हाणांना खडेबोल सुनावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या