…तर त्या सत्तेला काय अर्थ आहे?, चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

…तर त्या सत्तेला काय अर्थ आहे?, चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

Chitra Wagh And Uddhav Thackeray

पुणे : राज्यात महिलांबाबत घडलेल्या अनेक घटन ऐकल्यानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचं स्पष्ट दिसून येत. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला टीकेचे लक्ष्य करणाऱ्या भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना महाविकास आघाडी सरकारवर चित्रा वाघ जोरदार टीका केली आहे.

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी मागील दोन वर्षांमध्ये उच्चांक गाठला आहे, असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. लहान मुली, शाळकरी मुलींवर अत्याचार होत आहेत आणि पोलीस यंत्रणा हतबल झाल्याचे आपल्याला दिसत आहे. पुणे हे विद्येचं माहेर घर असं म्हटलं जातं. पण आता ते अत्याचाराचं माहेर घर झालं आहे का? पुणे तिथे काय उणे असं म्हणातात, तर इथे ज्या घटना घडत आहेत जे अत्याचार घडत आहेत ते देखील उणे नाहीत. रोजच घडत आहेत कुठे ना कुठे रोज चाललं आहे. हा विषय केवळ पुण्यापुरता मर्यादित नाही संपूर्ण महाराष्ट्राबद्दल आपण बोलणार आहोत, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

पुण्यात आज सावित्रीमायींच्या या भूमीत पत्रकार परिषद घेत असताना याचा उहापोह करणं तेवढंच जास्त गरजेचं आहे. आपण बघतो आहोत की, राज्यात रोज बलात्कार होत आहेत. विनयभंग, सामहिक बलात्कार होत आहेत. एवढच नाही तर एखादा नामचीन गुंडा हा तुरुंगातून बाहेर येतो आणि मोठ्या जोशात मिरवणुक काढतो, त्याची हिंमत बघा किती होते. एवढच नाही तर तो दणक्यात वाढदिवस साजरा करण्याची देखील हिंमत दाखवतो. हे चांगल्या समजासाठी तर वाईट आहेच. पण त्याही पेक्षा सरकारच्या अस्तित्वहीनतेचा हा पुरावा आहे. की कुणालाच त्याची भीती वाटत नाही, असंही चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेची एवढी वाईट अवस्था आम्ही आजपर्यंत पाहिलेली नव्हती. सत्ताधारीच जर राज्यातील महिलांना सुरक्षा पुरवत नसतील, तर त्या सत्तेला काय अर्थ आहे? आज महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. या दोन वर्षात महाराष्ट्राने काय नाही पाहिलं. चांद्यापासून बांद्यापर्यंत एक जिल्हा असा नाही, ज्या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या नाही, अशी टीका यावेळी चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या