‘अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय, महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न…कुछ तो शर्म करो’

‘अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय, महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न…कुछ तो शर्म करो’

'अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय, महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न...कुछ तो शर्म करो'

मुंबई – उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद आहे. मुंबईत काल मध्यरात्रीपासून आठ बसची तोडफोड झाली आहे. ठाण्यात बस बंद आहेत. नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समिती, तसंच दुकानंही बंद ठेवण्यात आली आहेत. महाविकास आघाडीतील नेते हे रस्त्यावर उतरून बंद मध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आणि व्यापारी वर्गाला आवाहन करत आहेत.

दरम्यान, अनेक ठिकाणी लोकांनी आणि व्यापाऱ्यांनी या बंदला विरोध केल्याचे देखील दिसून येत आहे. अनेक ठिकाणी दुकाने बंद असली तरीही व्यापार सुरूच असल्याचे देखील दिसून आले आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदच्या मुद्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका टिपण्णी करताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी भाष्य केले असून राज्यसरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्या म्हणाल्या, ‘राज्यातल्या धोरणांबाबत ढिम्म’ सरकार, दुसऱ्याच्या नावावर राजकारण साधायला पुढाकार’ असलेलं महाराष्ट्र सरकार. बलात्कार अत्याचार घटनांनी रोज महाराष्ट्र हादरून जातोय,अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय. महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न…कुछ तो शर्म करो… #NoMaharashtraBandh असं म्हणत वाघ यांनी शरसंधान केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या