मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री धनजंय मुंडे यांच्याविरोधात एका तरुणीने अत्याचाराची तक्रार दिली आहे. यामुळे खळबळ उडालेली आहे. पण मुंडेंनी हे आरोप फेटाळत आपण एका महिलेसोबत परस्पर संमतीने संबधात होतो अशी माहिती सोशल मीडियातून दिली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर ठाकरे सरकार चांगलंच अडचणीत सापडलं आहे. त्यातच विरोधी पक्ष भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेत थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. तसेच स्वतः धनंजय मुंडे किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा न घेतल्यास भाजप राज्यभर आंदोलन करत रस्त्यावर उतरेल, असाही इशारा देण्यात आलाय. त्यामुळे आता ठाकरे सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या @dhananjay_munde यांनी नैतिक जबाबदारीने तात्काळ राजीनामा द्यावा आणि पोलिसांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता कसून या प्रकरणाची चौकशी करावी ! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @MumbaiPolice @ANI pic.twitter.com/b4B93JKA4o
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 13, 2021
दरम्यान, भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ या देखील या प्रकरणी आक्रमक झाल्या आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी निपक्षपातीपणे चौकशी करावी.पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये.कितीही मोठा नेता असुदे दोषींना पाठिशी घालू नका.जोपर्यंत संपूर्ण तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले पाहिजे. अशा मोठ्या घटनांमध्ये पीडिता व तिच्या कुटुंबियांवर दबाव येऊ शकतो.पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ शकते.तपास कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. नैतिकता दाखवत धनंजय मुंडे यांनी आपल्या पदावरून पायउतार व्हावं असं भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- हे पण आम्हीच केले…औरंगाबादमध्ये रंगली सेना- काँगेसमध्ये श्रेयवादाची लढाई
- परिसराची स्वच्छता हाच बर्ड फ्ल्यू टाळण्याचा मंत्र
- ‘गेंड्याच्या कातडीचे मंत्री व महाविकास आघाडीचे सरकार मुंडेंचा राजीनामा घेतील, असं वाटत नाही’
- ज्यांचा कोरोना लसीवर विश्वास नाही त्यांनी पाकिस्तानात निघून जावे; भाजप नेत्याचा अजब सल्ला
- कोरोनाचे संकट दूर होऊ दे…सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे; भरणे यांचे सिद्धरामेश्वरांकडे साकडे