मुंबई: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत (Mumbai Bank Election) भाजप नेते आ. प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळवला आहे. यापूर्वी १७ जागा बिनविरोध आल्या होत्या. या ४ जागांची मतमोजणी नुकतीच पार पडली. प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. यावरच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.
‘मुंबै बॅंकेच्या निवडणूकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या नेतृत्वात सहकार पॅनेलचा विजय झाला. सर्वच २१ जागा जिंकल्या. मतदारांनी बॅंकेच्या कारभारावर विश्वास दर्शवला आहे. सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन! प्रवीण दरेकर यांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से..!’, असे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावला आहे.
मुंबै बॅंकेच्या निवडणूकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते @mipravindarekar यांच्या नेतृत्वात सहकार पॅनेलचा विजय झाला..सर्वच २१ जागा जिंकल्या
मतदारांनी बॅंकेच्या कारभारावर विश्वास दर्शवलाय
सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन!प्रवीण दरेकर यांचा तिन्ही पक्षांना
‘जोर का झटका धीरे से..!— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 3, 2022
दरम्यान मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कंझ्यूमर्स) मतदार संघातून विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांचा पराभव केला. विठ्ठल भोसले यांना १८ मतं तर सुखदेव चौगुले यांना १६ मतं मिळाली. प्राथमिक ग्राहक मतदार संघात पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पुरुषोत्तम दळवी यांना १३१ मतं तर कमलाकर नाईक यांना ५९ मतं मिळाली. तर, महिला सहकारी संस्था मतदार संघ जयश्री पांचाळ यांना ३३२ मतं तर, शालिनी गायकवाड यांना १८८ मतं मिळाली आहेत. तसेच अनिल गजरे यांना तब्बल ४ हजार मते मिळाली तर, यलाप्पा कुशाळकर यांना अवघी ३५० मते मिळाली आहेत.
मुंबई बँकेत अभिजीत घोसाळकर, सुनिल राऊत, अभिजीत अडसूळ, शिल्पा सरपोतदार हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. तर, निवडणुकीतून शिवसेना बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम यांनी माघार घेतली. तर कमलाकर नाईक यांनी बंडखोरी कायम ठेवली. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
महत्वाच्या बातम्या
- “१० मंत्री आणि २० आमदारांना कोरोना झाला…”,अजित पवारांनी दिले लॉकडाऊनचे संकेत
- ठाण्यात मंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत लसीकरण शिबीरास प्रारंभ
- लोकांनी मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवला असल्याने हा विजय मिळाला- प्रविण दरेकर
- अभिनेता जॉन अब्राहमसह पत्नी प्रिया कोरोना पॉझिटिव्ह
- योगी सरकारची कायदा आणि सुव्यवस्थेवर पकड; मोदींकडून कौतुक