fbpx

शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय काहींना मोठेपणा मिळत नाही – वाघ

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले आहे, मात्र अजूनही सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. निवडणुकींनंतर आता दुष्काळाकरून टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रवक्ता चित्रा वाघ यांनी काही लोकांना शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

सरकारमधील मंत्र्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देणे गरजेचं आहे. आघाडी सरकारच्या काळामध्ये ऑगस्ट महिन्यात छावण्या सुरु केल्या जात. मात्र सध्याचे सरकार विधानसभेची तयारी करत आहे. राज्यातील भाजप – शिवसेना सरकारला शेतकरी, कामगार, कष्टकऱ्याचे देणेघेणे नाही. अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळावरून शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता वाघ म्हणाल्या, शरद पवार यांची पॉवर मोठी आहे, त्यामुळे राज्य असो कि देश त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणालाही मोठेपणा मिळत नाही.