‘रश्मीताई, संजय राऊतांच्या तालिबानी प्रवृत्तीच्या तुम्ही मुसक्या कधी आवळणार ?’

sanjay raut vs chitra wagh

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज सामनातील अग्रलेखात आज साकीनाका बलात्कार प्रकरणावर भाष्य करतानाच देशातील इतर राज्यांमधील इतर अशा घटनांचा उल्लेख करत राजकीय टीका करण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत यांच्या आजच्या अग्रलेखावर भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

‘संजय राऊत यांचा सामनातला अग्रलेख म्हणजे त्यांच्यातील महिलांबाबतची असणाऱ्या तालीबानी प्रवृतीचं हे उदाहरण आहे. अहो राऊत…एका महिलेवरती अमानवीय अत्याचार झालेला आहे त्यामुळे तिचा ज्या यातनेने मृत्यू झाला असेल तुम्हाला ते या जन्मातही समजणार नाही. अशा दुर्दैवी घटनेवरती राजकारणाची पोळी भाजण्यासाठी तिचा वापर करता आणि महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशची तुलना करता,’ असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.

‘नाकर्तेपणा तुमचा गुणधर्म झालेला आहे. फक्त भावनिक गप्पा झोडायच्या आणि मग घटनेनंतर म्हणायचे…ताई, घाबरू नका चिंता करू नका, हल्लेखोरांना शिक्षा होईल. आणि फक्त अशी भावनिक भुरळ घालायची. संजय राऊत, तुम्ही मुंबई सिपी केंव्हापासून झालात?? तपास पुर्ण व्हायच्या आधीच तुम्ही अग्रलेखातून अत्याचार करणारा ‘एकच’ नराधम होता असे घोषीत करताय. ही धडपड कुणाला वाचवण्यासाठी ? की ही विकृती ? असे सवाल करत वाघ यांनी राऊतांवर आगपाखड केली.

यासोबतच, ‘मला सामनाच्या सर्वेसर्वा रश्मीताई ठाकरे यांना हेच विचारायचे आहे की तुमचे कार्यकारी अशा स्त्री अत्याचारी अमानवीय घटनेचा वापर राजकारणातील हेव्या-दाव्यांसाठी करत आहेत. अशा तालीबानी प्रवृत्तीच्या तुम्ही मुसक्या कधी आवळणार?’ असा प्रश्न वाघ यांनी थेट रश्मी ठाकरे यांना केला आहे.

महत्वाच्या बातम्या :