चितळे बंधूनी कामावरून काढून टाकलेल्या कामगारांचं आत्मक्लेश आंदोलन

chitle

पुणे : पुण्यातील चितळे बंधू मिठाईवालेंच्या मिठाई कारखान्यातील कामगारांना कामावरुन काढून टाकण्याचं प्रकरण आता तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत . कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कामगारांनी आज कामगार पुतळ्याजवळ आत्मक्लेश आंदोलन केलं ,तसेच चितळे बंधूंनी केलेल्या कारवाईचा यावेळी निषेध केला.

चितळे बंधूंच्या गुलटेकडी भागातील कामगार गेले काही दिवस पगारवाढीची मागणी करत होते यावरून चितळेंचं व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये संघर्ष सुरु आहे.पगारवाढ मागणाऱ्या 60-70 कामगारांना व्यवस्थापनाने कामवरुन काढून टाकलं.कामगारांनी कामगार संघटना स्थापन करुन कामागार आयुक्तालयात याबात तक्रार देखील दिली. मात्र चितळेंकडून कोणीही कामगार आयुक्तांसमोरच्या सुनावणीला हजर राहिलं नाही आणि त्यानंतर कामगारांना काम देण्यासही बंद करण्यात आलं.

आज कामावरून कामगारांनी एकत्र येत आजकामावरून काढून टाकण्यात आलेल्या कामगारांनी आज कामगार पुतळ्याजवळ आत्मक्लेश आंदोलन केलं ,तसेच चितळे बंधूंनी केलेल्या कारवाईचा निषेध केला.लवकरच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची आम्ही भेट घेऊन या प्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती करणार असल्याच कामगारांनी सांगितलं.