fbpx

सीमेनंतर आता विमानातही चीनचा उद्दामपणा ; भारतीय प्रवाशाला दिली ‘अशी’ वागणूक

china-eastern-airlines

वेबटीम : भारत आणि चीन दरम्यान डोकलाम सीमेवरून सुरु झालेला वाद थांबताना दिसत नाही. त्यामुळे चीन आणि भारताचे राजनीतिक, आर्थिक संबंध ताणले आहेत. तर आता एका भारतीय प्रवाशाला शांघाई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर अपमानस्पद वागणूक दिली गेल्याची घटना समोर आली आहे.

नॉर्थ अमेरिकन पंजाबी असोसिएशनचे कार्यकारी निर्देशक असणारे सतनाम सिंह चहल हे नवी दिल्ली ते सॅन फ्रांसिस्को जाण्यासाठी चायना ईस्टर्न एयरलाइंसने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांना सॅन फ्रांसिस्को जाणाऱ्या विमानासाठी शांघाई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर थांबाव लागल. याची तक्रार संबंधित विमान कंपनीशी केली असता त्यांचे अधिकारी चहल यांचावरच खवळले. या चीनी अधिकाऱ्यांचा एकूणच रोख हा भारत आणि चीनमध्ये बिघडत्या सीमा वादामुळे दुषित झालेला होता. तसेच डोकलाम सीमेवरून गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या सीमा वादावर हे अधिकारी भाष्य करत होते.

चहल यांच्या सोबत घडलेल्या या सर्व प्रकाराची तक्रार त्यांनी पत्राद्वारे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे. तसेच भारतीय प्रवाशांनी चीन मार्गे प्रवास करण्यास टाळण्याचे आवाहन करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान चीनकडून अस काही झालेच नसल्याचा दावा करण्यात आला आहे.