ना ‘लक्ष’ ना ‘मन’, ‘त्रस्त जनता जनार्धन’; चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

टीम महाराष्ट्र देशा – ‘स्वतः च्या भल्यासाठी पक्षांतर केले, जनतेसाठी काय केले’?, ना ‘लक्ष’ ना ‘मन’, त्रस्त जनता जनार्धन’ असे फलक लाऊन आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सत्तेत येऊन भाजपला साडेचार वर्ष पूर्ण झाले आहेत. तरी, देखील पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्न तसेच राहिले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवड परिसरात फलकबाजी करण्यात आली आहे. यामाध्यमातून सरकारचे प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

हे फलक पिंपरी, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, वाकड, रहाटनी, चिंचवड, थेरगाव, वाल्हेकरवाडी परिसरात लावण्यात आले आहेत.
या फलकावरती लिहिलेले आहे की,

“पिंपरी-चिंचवडकर विचारतायं रेड झोनचा प्रश्न अजूनही लाल फितीत कसा?, “रिंग टेंडर काढणारे ठेकेदार, जनतेच्या पैशाची थांबवा लूटमार”


“पारदर्शकतेचा प्रचार जोरात अन्‌ नातेवाईकांना टेंडरची खैरात”, “पार्लमेंट ते पालिका सत्ता तुमच्याच हाती, मग का मंदावली शहर विकासाची गती”


“शहराला लागला गुन्हेगारीचा फास, मिटले नाही भय भिती चोवीस तास”

“हक्काचे घर त्रासापासून कधी सुटणार, अनधिकृतचा प्रश्न सांगा कधी मिटणार”


“ढिसाळ नियोजनापायी नशिबी येणार पाणी टंचाई”, “गॅस, लाईट बिल, किराणा, शिक्षण भाज्या, पेट्रोल महागले”

“अच्छे दिनंच काय केल?, ‘जगणं इतंक महाक का झाल?, “स्वतः च्या भल्यासाठी पक्षांतर केले, जनतेसाठी काय केले’?, ना ‘लक्ष’ ना ‘मन’, त्रस्त जनता जनार्धन”

राष्ट्रवादीने यामाध्यमातून भाजपला लक्ष करत पोस्टरबाजीच्या माध्यमातून अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत.

“भाजपने निवडणुकीपूर्वी जनतेला विविध आश्वासने दिली होती. पंरतु, केंद्रातील सत्तेचा कार्यकाळ संपत आला. तर, राज्यातील सत्तेला साडेचार वर्ष पुर्ण झाली आहेत. तरीही, दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करता आला नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्न प्रलंबित आहेत. सर्वसामान्य नागरिकांची भाजप सरकारने फसवणूक केली आहे. फसवी कर्जमाफी, हमीभाव ही घोषणा केवळ घोषणाच राहिली आहे. भाजपने केवळ ‘गाजर’ दाखविण्याचे काम केले आहे. जनतेचे प्रश्न अजूनही सुटले नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार सुरु आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी फलक लावले असल्याचे” काटे यांनी सांगितले.