५९ अॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनची पहिली प्रतिक्रिया

blank

मुंबई : भारत-चीन सीमारेषा भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या 59 अॅप्स वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यात टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यासारख्या अनेक अॅप्लिकेशनचा समावेश आहे. नुकतंच याबाबतचं पत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

वनहक्क जमिनीची प्रलंबित प्रकरणे त्वरित मार्गी लावण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

डेटा आणि गोपनीयता समस्यांमुळे भारत सरकारने हे पाऊल उचललं असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान भारतात टिक-टॉक लाखो चाहते आहेत. या चाहत्यांना मात्र यामुळे झटका बसला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउझर आणि हॅलो अॅप यासारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे.

पडळकरांची पवारांवर टीका; उदयनराजे भोसले यांची पहिली प्रतिक्रिया

आता केंद्र सरकारने सोमवारी धडक पाऊल उचलत टिकटॉक, शेअरइट, वुईचॅटसह 59 मोबाईल अॅप्सवर बंदी घातली. त्यातून भारताने चीनला जोरदार डिजिटल दणका दिल्याचे मानले जात आहे. यावर आता चीनने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी म्हंटले कि, चीन याबाबत चिंतेत असून परिस्थितीची पडताळणी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले आहे.