fbpx

भारतात रहाणा-या चीनी नागरिकांसाठी चीनकडून सतर्कतेच्या सूचना

नवी दिल्ली : डोकलाम भूभागावरून भारत व चीन यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने भारतात रहाणा-या नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये भारतामध्ये आपल्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे. याबरोबरच आपत्ती व आजारांपासूनही आपले रक्षण करावे, असे चीनच्या भारतातील दूतावासाने म्हटले आहे.गेल्या दोन महिन्यांमध्ये दुस-यांदा अशा प्रकारे सूचना देण्यात आल्या आहेत. या आधी ८ जुलै रोजी अशा सूचना देण्यात आल्या होत्या. एकीकडे चीनकडून भारताला युद्धाची धमकी दिली जात असताना दुसरीकडे भारताकडून चर्चेने समस्या सोडवण्याचा आग्रह केला जात आहे.