याबाबत प्रथमच चीनने दिला भारताला उघड इशारा !

blank

टीम महाराष्ट्र देशा : तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा यांचा उत्तराधिकारी चीनमधीलच असेल. या निवड प्रक्रियेमध्ये भारतने कोणताही हस्तक्षेप करू नये, असे चीनने म्हटले आहे. दलाई लामांच्या निवडीच्या अतिसंवेदनशील प्रकरणी चीनने प्रथमच भारताला उघड इशारा दिला आहे. दलाई लामांची निवड पूर्वजन्माच्या निकषांच्या आधारे करण्याची प्रथा आहे. त्यासाठी चीन सरकारची मान्यता असणे अनिवार्य असेल. तसेच सुमारे 200 वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेनुसार नवीन दलाई लामांची निवडही चीनमधूनच केली जावी, असे चीनने म्हटले आहे.

दलाई लामा यांचे वय 84 वर्षे आहे. त्यांच्या प्रकृतीअस्वास्थतेमुळे गेल्या दोन वर्षांपासून उत्तराधिकारी शोधण्याच्या विषयी वेगवान चर्चा व्हायला लागली आहे. त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड हा ऐतिहासिक, धार्मिक आणि राजकीय विषय आहे. या उत्त्तराधिकाऱ्याची निवड करण्यसाठी चीनमधील संस्था समर्थ आहेत, असे तिबेटसाठीच्या चीनच्या उपमंत्र्याने म्हटले आहे.