भारत – नेपाळच्या मैत्रीत चीनने फूट पाडू नये; पुण्यातील नेपाळी नागरिकांच्या भावना

india vs nepal

पुणे- भारतात जवळपास साठ लाख नेपाळी कुटुंब वास्तव्यास आहेत व आजच्या या covid-19 च्या परिस्थितीतही येथील नेपाळी बांधवांची सरकारकडून चांगल्या प्रकारे काळजी घेतली जात आहे. त्यामुळे नेपाळ सरकारनेही सावध व्हावे आणि चीनने भारत नेपाळच्या मैत्रीत फूट पाडू नये अन्यथा चिनविरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा पुण्यातील भारत – नेपाळ मैत्री परिवार या संस्थेच्या वतीने नेपाळी नागरिकांनी दिलाय.

मागील अठरा वर्षांपासून पुण्यात राहणारे भारत नेपाळ मैत्री परिवार या संस्थेचे अध्यक्ष अजय अधिकारी म्हणाले, नेपाळ सरकार चीनचे ऐकून भारताविरोधात ज्या काही कुरापती करत आहे त्या नेपाळ सरकारने करू नये. नेपाळच्या पंतप्रधानांनी चीन म्हणेल त्याप्रमाणे वागू नये. अन्यथा भारतातील साठ लाख नेपाळी कुटुंबीय तुमच्या विरोधात निदर्शने करतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.

मागील नऊ महिन्यापासून पुण्यात राहत असलेले कमल गौतम म्हणाले, दोन देशातील मोठ्या व्यक्तींच्या राजकारणात छोटे-मोठे उद्योगधंदे करून उदरनिर्वाह करणाऱ्या आमच्यासारख्या नागरिकांचे नुकसान होऊ शकते. मागील अनेक वर्षापासून आम्ही भारतात राहतो, येथे आम्हाला कसलाही त्रास नाही, इथे आम्हाला स्वातंत्र्य आहे. माझा जन्म नेपाळ मध्ये झाला असला तरी शिक्षण, नोकरी भारतातच आहे. पुढे जाऊन भारत आणि नेपाळच्या नात्यामध्ये कटूता येईल असं कुठलंही पाऊल नेपाळ सरकारने उचलू नये अशी आमची इच्छा आहे.

महत्वाच्या बातम्या-

शेतकरी बांधवांना चिंतामुक्त व समृध्द करण्यासाठी शासन कटिबध्द – दादा भुसे

..तर पुढच्या निवडणुका एकत्र लढवू, शरद पवारांचे संकेत

अशोक गेहलोत यांच्या अडचणी सुरुच,निकटवर्तीय उद्योगपतींच्या घरावर आयकर विभागाचे छापे

अक्षय कुमारचा येणारा ‘हा’ चित्रपट आणखी लांबणीवर