चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले

नवी दिल्ली : कोरोनाने आशियाई देशांसह जगभरात थैमान घातले आहे. या रोगाची उत्पत्ती हि चीनमधील वुहान या शहरातून झाली व बघता बघता रौद्ररूप धारण करून याचा जगभर प्रसार झाला. आज पर्यंत या रोगाने ५०,००० हुन अधिक जगभरातील नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इटली, अमेरिका, जर्मनी इत्यादी सर्वच देशांसह आशिया मधील चीन, भारत, पाकिस्तान , बांग्लादेश व सर्व छोट्या, मोठ्या देशांमध्ये याचा प्रसार झाला आहे.

पाकिस्तान हा चीनचा मित्र देश मानला जातो. तर या मोठ्या संकटात पाकिस्तान देखील सापडला असल्याने चीनची मदत हि पाक ला अपेक्षित होतीच. मात्र या आधी देखील काही देशांना वैद्यकीय साहित्य पुरवण्याचा व्यवहार करून निकृष्ट दर्जाचे पुरवठा केला होता. यावर त्यांनी नाराजी व्यक्त करून पुढील कंत्राट व व्यवहार रद्द केले होते.

मात्र यावेळी स्वतः चा मित्र देश असणाऱ्या पाकिस्तान सोबत देखील चीनने हीच आगळीक केली असल्यासाचे समजते. चीनने पाठवलेले वैद्यकीय साहित्य उघडल्यानंतर पाकिस्तानला धक्काच बसला. N-95 मास्क ऐवजी चक्क निकृष्ठ दर्जाचे व अंडरवेअर पासून बनविलेल्या मास्कचा पुरवठा केल्याचे उघड होत आहे. या आधी देखील चीन असा गैरव्यवहार करत असल्याची तक्रार अनेक युरोपियन देशांनी केली होती.

काही दिवसांपूर्वीच चीन हि मदत देणार असल्याने पाकिस्तान चे पंतप्रधान इमरान खान याने आनंद व्यक्त केला होता. मात्र मोठ्या गाजवाजाने जेव्हा हि आलेली मदत पाकिस्तान च्या अधिकाऱ्यांनी पहिली तेव्हा मात्र त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, हि क्रूर चेष्टा असून आता तरी या घटनेपासून पाकला अद्दल घडली असावी असे वाटतंय. या महामारीनंतर मात्र जागतिक परिषद चीनला वारंवार या गैरवर्तनाबद्दल काय शिक्षा देते हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.