चीनने दिले प्रत्युत्तर ! अमेरिका जाणूनबुजून चीनला बदनाम करतीये : परराष्ट्र मंत्र्यांनी दिला इशारा

trump and china

अंतरराष्ट्रीय : जगात थैमान घातलेल्या कोरोनास जबाबदार चीन आहे, असे आता जागतिल बहुतांशी देश म्हणत आहेत. तर कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई चीनने द्यावी, अशी मागणी अमेरिकेसह अनेक युरोपीय देश करत आहेत. मात्र यावर आता चीनने प्रत्युत्तर दिले आहे.

चीनचे परराष्ट्र मंत्री वॉन्ग म्हणाले की, चीनवर आज दबाव आणला जात आहे. मात्र चीनला देखील कोरोनाचा फटका बसला आहे. आम्ही वुहान लॅब टेस्टसाठी तयार आहोत. मात्र ही तपासणी कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशीवय व्हावी.

कोरोनाचा फटका बसूनही जेव्हा गरज पडली, तेव्हा इतर गरजू सरकारांचीही चीनने मदत केली आहे. अम्हाला वाईट वाटते की, कोरोना शिवाय, अमेरिकेत, एक राजकीय व्हायरसदेखील पसरला आहे. जो चीनवर हल्ला करण्याची आणि चीनला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही.

तथ्य माहित नसलेल्या काही अमेरिकन नेत्यांनी खोटी माहिती पसरवली आहे आणि अनेक कटही रचले आहेत. अशा प्रकाचे खटले आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कसोटीवर सिद्ध होणार नाहीत. हे विवेकाला धरून नसेल. हे खोटारडे, न्यायसंगत नसलेले आणि बेकायदेशीर आहेत.

दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते, की चीनने कोरोना संदर्भात माहिती लपवून जागतीक अर्थव्यवस्थेचे नुकसान केले आहे.कोरोनासंदर्भात अमेरिकेने चीनवर आरोप केल्यानंतर जर्मनी आणि फ्रान्स सारख्या देशांनीही चीनलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. तर या देशांनी कोरोनामुळे झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही चीनकडे केली होती.

महत्वाच्या बातम्या

धक्कादायक : महाराष्ट्राच्या अजून एका मोठ्या मंत्र्याला कोरोनाची लागण

सीमेवर कोरोना रोखणा-या सरपंच उपसरपंच पोलिस पाटलांचा प्रमाण पञ देवुन सन्मान

‘केंद्राकडून पॅकेज देण्यात आलेलं पॅकेज उघडलं, तर तो फक्त रिकामा खोका निघाला’