#Coronovirus: व्हायरसबद्दल जगाला पहिल्यांदा सावध करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनामुळेच मृत्यू

वुहान : चीनमध्येकोरोना विषाणूच्या संक्रमणाने सध्या हाहाकार माजला आहे. या विषाणुमुळे अनेक लोकांचा बळी जात आहे. या जीवघेण्या कोरोना विषाणूबाबत सर्वात आधी धोक्याचा इशारा देणाऱ्या डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ली वेनलियांग असे या डॉक्टरचे नाव आहे. ली वेनलियांग यांना सुद्धा कोरोना विषाणूची लागण झाली होती.

गुरुवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चीनच्या वुहान शहरात या कोरोना विषाणूची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला जात होता, तेव्हा डॉक्टर ली वेनलियान्ग यांनी रुग्णालयातून एक व्हिडीओ पोस्ट करत जगाला या जीवघेण्या विषाणूबाबत सावध केलं होतं.

Loading...

तसेच डॉक्टर ली हे वुहान सेंट्रल रूग्णालयात कार्यरत होते. 30 डिसेंबर रोजी डॉक्टर ली यांनी काही डॉक्टरांशी एका व्हायरसबद्दल चर्चा केली होती. मात्र तेव्हा त्यांना कल्पना नव्हती की, हा व्हायरस कोरोना व्हायरस आहे. वीबोवर लिहिलेल्या पोस्टवर डॉक्टर ली यांनी सविस्तर माहिती दिली होती. 10 जानेवारी रोजी डॉक्टर ली यांना खोकला झाला. त्यानंतर ताप आला. दोन दिवसांत त्यांची तब्बेत इतकी बिघडली की त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. एवढंच नव्हे त्यांचे आईवडिल देखील आजारी पडले. त्यांना देखील रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणुमुळे झालेल्या मृतांचा आकडा हजारोंमध्ये असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चीनमधली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या टेनसेंटने कोरोना विषाणूमुळे 24 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
एकनाथ खड्सेंचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास ; फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत