हाफिझ सईदला पाकमधून दुसऱ्या देशात पाठवण्याचा चीनचा सल्ला

कराची – मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिझ सईदवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढत असून, सईदला सुरक्षित ठेवायचे असेल तर त्याला पाकिस्तानमधून अन्य देशांत हलवा, असा सल्ला चीनने पाकिस्तानला दिला आहे.हाफिझला दुसऱ्या देशात हलविण्याबाबत पाकिस्तानने आता विचार करावा, असे चीनने म्हटले आहे. हाफिझ सध्या आंतरराष्ट्रीय आणि भारतीय संस्थांच्या निशाण्यावर आहे.

गेल्या महिन्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची बोओ फोरममध्ये भेट झाली. त्या वेळी जिनपिंग यांनी सईदला पश्चिम आशियामध्ये हलविण्याचा सल्ला दिला होता. सईदला पाकिस्तानातून हलविले तरच तो पुढील आयुष्य सुखाने जगू शकेल, असे चीनने म्हटले आहे.चीनच्या सल्ल्यानंतर पाक हाफिझ सईदला अन्य देशात हलवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

You might also like
Comments
Loading...