कियारा अडवाणीची हुबेहूब नक्कल करणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल

kiyara adwani

मुंबई :  बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या यशाच्या शिखरावर आहे. अनेक बड्या अभिनेत्यासोबत तिने काम केले आहे. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने अनेकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. नुकताच तिचा ‘शेरशाह’ चित्रपट सुपरहिट  ठरला. यामध्ये तिने कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या प्रेयसी डिंपल यांची भूमिका साकारली आहे. यामधील तिच्या सिंपल लुकने सर्वांचे लक्ष वेधले. मात्र सध्या कियाराची चिमुकल्या चाहतीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

या चिमुकलीचे नाव कियारा खन्ना असून तिने कियाराची हुबेहूब नक्कल केली आहे. ऐवढच नाही तर चित्रपटामध्ये कियाराने परिधान केलेला लूक सुद्धा तिने परिधान केल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकरी फिदा झाले असून या छोट्या मुलीचे कौतुक होतं आहे. सध्या तिच्या व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

या छोट्या कियाराचा हा व्हिडीओ सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराने देखील त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत तिचे कौतुक केले आहे. दरम्यान, कियारा आडवाणी लवकरच ‘भूल भुलैया 2’, ‘शेरशाह’, ‘जुग जुग जियो’ आणि ‘मिस्टर लेले’ या चित्रपटात झळकणार आहे.

महत्वाच्या बातम्या :