चॉकलेटच्या आमिषाने दर्ग्यात खेळणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार, आरोपी मुल्लावर गुन्हा दाखल

लातूर : चॉकलेटचे आमिष दाखवून एका २५ वर्षीय नराधमाने सात वर्षाच्या मुलीवर घराच्या पाठीमागे नेऊन अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना निलंगा तालुक्यातील शेडोळ येथे घडली. या प्रकरणी निलंगा पोलीस स्थानकात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेडोळ येथे ६ एप्रिल रोजी दुपारी ३ च्या सुमारास एक चिमुकली दर्ग्यात खेळत होती. यावेळी अक्रम जिब्राईल मुल्ला याने घराजवळ मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून दर्ग्याच्या मागे नेले. आणि तिच्यावर अत्याचार केला. अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केल्यावर आरोपी मुल्ला तिला धमकी देत तेथून पळून गेला.

पीडित मुलीने आपल्यासोबत झालेला प्रकार आई-वडिलांना सांगितल्यावर त्यांनी पोलीस स्थानक गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अक्रम जिब्राईल मुल्ला याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी दिनेशकुमार कोल्हे हे करत आहेत.