मदरशांमधून शिकलेले मुले दहशतवादी होतात ; वक्फ बोर्ड

terrorism 2

नवी दिल्ली : शिया सेंट्रल वक्फ बोर्डेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहिले आहे. पत्रात असे नमूद आहे कि मदरशांमधून शिकलेले मुले दहशतवादी होतात. त्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात जर आणणे गरजेचे आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची श्यक्यता आहे.

मुस्लीम मुलांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचे निधी घेऊन मदरसे उभारण्यात येतात. मात्र अनेक ठिकाणी मदरसे केवळ कागदोपत्री दाखवून स्वतःच्या तुंबड्या भरल्याचा प्रकार उघड झाला होता. अनेक मदरशांमध्ये शैक्षणिक सुविधा नसतात. त्यामुळे शिया सेंट्रल वक्फ बोर्डेने असे मत व्यक्त केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

बोर्डेचे अध्यक्ष वसीम रिझवी म्हणाले, मदरशांमधून शिकलेली किती मुले डॉक्टर, इंजिनिअर, सनदी अधिकारी झाले? मदरशांमधून फक्त दहशतवादीच तयार होतात. मदरशांना सीबीएससी, आयसीएसई यांच्याश संलग्न करून धर्मावर आधारित शिक्षण पर्यायी ठेवावे. यावरून, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी वसीम रिझवी त्यांचा आत्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विकला अशी टीका देखील केली होती.