कोविड 19 च्या साथीमुळे लहान मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण घटलं;युनिसेफने व्यक्त केली चिंता

polieo

नवी दिल्ली- रोगांपासून बचाव करणाऱ्या लसी लहान मुलांना देण्याचं प्रमाण जगभरात घटत असल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोविड-19 च्या जागतिक साथीमुळं लसींच्या वितरणावर परिणाम झाला असून लोकांचंही याकडं दुर्लक्ष झालं असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, देशात कोविड 19 आजाराचे गेल्या 24 तासात विक्रमी 20 हजार 7 83 रुग्ण बरे झाल्यानं देशात आत्तापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांनी 6 लाखांचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालायानं दिली आहे.

आत्तापर्यंत एकंदर 6 लाख 12 हजार 8 शे 15 रुग्ण बरे झाल्यानं रुग्ण बरे होण्याचा दर 63 पूर्णांक 25 शतांश टक्के झाला आहे. गेल्या 24 तासात 32 हजार 695 नव्या कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे देशातील एकूण रुग्ण संख्या 9 लाख 68 हजार 876 वर पोहोचली आहे.

एका दिवसात कोविड रुग्ण आढळण्याची ही उच्चांकी संख्या आहे. काल 606 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यानं या रोगामुळे देशातील एकंदर मृतांची संख्या आता 24 हजार 915 झाली आहे. गेल्या 24 तासात 3 लाख 26 हजार 682 कोरोना चाचण्या विविध प्रयोग शाळांमधून करण्यात आल्या आहेत अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेनं दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

नगरच्या राजकारणाचा सुसंकृत किस्सा : ‘तोपर्यंत’ तरी सुजय विखे अन् संग्राम जगतापांचा याराना…

संजय राऊत, सुशांत सुशांत सिंह राजपूतला ‘हा’ रोल करणार होते ऑफर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्र्यांप्रमाणे रझा अकादमीची पाठराखण करतात का?

आघाडीत बिघाडी : सरकार आघाडीचे आहे याची काळजी घ्या, राहुल गांधींच्या खास व्यक्तीने खडसावले