अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन

मुंबई : अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं असून तिचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘डॅडींची छोटी मुलगी आणि मम्माचं संपूर्ण विश्व.. आमची चिमुकली परी’, असं कॅप्शन मृणालने या फोटोला दिलं आहे. मृणालने फेब्रुवारी महिन्यात इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांना दिली होती. तिने लहान बाळाचे कपडे आणि खेळणी यांचा फोटो शेअर केला होता. ‘आम्ही आमच्या घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी सज्ज झालो आहोत.’, असं कॅप्शन तिने फोटोला दिलं होतं.

मृणालने तिच्या मुलीचं नावंसुद्धा फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. ‘नूर्वी’ असं तिच्या मुलीचं नाव आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मृणालला ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. 2016 मध्ये तिने नीरज मोरेशी लग्न केलं. नीरज हा सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. लग्नानंतर ती अमेरिकेत वास्तव्यास आहे.

माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकांमध्येही मृणालने भूमिका साकारल्या आहेत. ‘अस्सं सासर सुरेख बाई’ ही मालिका अर्ध्यातच सोडून तिने काही काळासाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती पुन्हा एकदा ‘हे मन बावरे’ मालिकेत झळकली.

महत्वाच्या बातम्या :

“शरद पवार भीष्म पितामह तर देवेंद्र फडणवीस अर्जुन”, राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मोहित कंबोज यांची टीका
“मोदींच्या काळात हुकुमशाहीचा अनुभव” शत्रुघ्न सिन्हा यांचा मोदींवर निशाणा
IPL 2022: CSKच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर संतापला कर्णधार जडेजा; खराब कामगिरीचे कारण केले स्पष्ट
IPL 2022: CSK विरुद्ध शानदार विजयानंतर कर्णधार राहुलने केले ‘या’ खेळाडूचे कौतुक; म्हणाला ‘तो फायटर…’
“जुन्या पोस्ट काढून खेळणाऱ्या विकृत सोशल भावांनो…”, रुपाली पाटलांचा हल्लाबोल