आश्चर्यकारक ! या पाच वर्षाच्या चिमुरडीने धनुर्विद्येत बनवले दोन विश्वविक्रम

वय अवघे पाच वर्षे मात्र तीन बनवलेले रेकॉर्ड भल्या-भल्यांना लाजवतील असे आहेत. विजयवाडामधील अवघ्या पाच वर्षाची असणाऱ्या आर्चर चेरुकूरी डॉली शिवानी हिने रविवारी धनुर्विद्येत दोन विश्वविक्रम केले आहेत. यामुळे सध्या संपूर्ण भारतात तीच नाव चर्चिल जात आहे.

डॉली ने पहला रेकॉर्ड हा 10 मीटर अंतरावरून केवळ 11 मिनट आणि 19 सेकंडमध्ये 103 बाण सोडवण्याचा केला. तर दुसरा विक्रम हा पाच मिनिटे आणि आठ सेकंदांच्या वेळात 20 मीटरपासून 36 बाण सोडण्याचा केला. यामध्ये तिने एकूण 360 गुणांपैकी 2 9 0 गुणांची कमाई केली. हे दोन्ही रेकॉर्ड बनवत शिवानीने एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये जागा मिळवली आहे.

ही पहिलीच वेळ नाही की शिवानीने असा विश्वविक्रम केला. द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार तिने आपल्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमिताने केलेल्या प्रयत्नात २०० गुणांची कमाई करत असा विक्रम करणारी भारतातील सर्वात यंग तिरंदाज होण्याचा विक्रम केला होता. दरम्यान उपराष्ट्रपती वकैया नायडू यांनी ट्विटर वरून डॉली शिवानीचे अभिनंदन केले आहे.