BJP। मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील आमदार आणि प्रवक्ते दीपक केसरकर हे अनेक गौप्यस्फोट करत आहेत. केसरकर यांनी काल केलेल्या एका वक्तव्यामुळे आता त्यांच्यावर टीका होण्यास सुरवात झाली आहे. केंद्रय मंत्री नारायण राणेंच्या कुटुंबाकडून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न झाला, असं गंभीर वक्तव्य केसरकर यांनी केलं होत. त्यानंतर आता भाजपा नेते राजन तेली यांनी दीपक केसरकर यांना थेट इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि नव्या निर्णयांमुळे राज्यातील जनता खुश आहे. दीपक केसरकरांनी उगाच भाजप नेत्यांनी काय करावं, असे सल्ले देऊ नये. मुख्यमंत्री साहेबांनी दीपक केसरकरांना आवरावं, असं राजन तेली म्हणाले आहेत. दीपक केसरकरांनी आपल्या मतदार संघात काय सुरु आहे, याकडे लक्ष द्यावे. महाराष्ट्रात एवढ्या चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. आतापर्यंत जे निर्णय ठाकरे सरकारने घेतले नाहीत, एवढे ऐतिहासिक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतले आहेत. त्यामुळे आज केसरकर वेगळ्या दिशेने वातावरण घेऊन जात आहेत. त्यांना थांबवण्याची गरज आहे. त्यांनी भाजपच्या कोणत्याही नेतृत्वार बोलू नये, अशी विनंती आहे.
नेमकं काय म्हणाले होते केसरकर ?
उद्धव साहेबांची आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली आणि जे काही मला उद्धवसाहेबांच्या आणि पंतप्रधान मोदींच्या बोलण्यातून समजत होतं की, खऱ्या अर्थाने कुटुंबप्रमुख कसा असावा, हे पंतप्रधान महोदयांनी त्याठिकाणी दाखवून दिलं. तर मोदींशी संबंध जपण्यास ठाकरेंनी तयारी दाखवली होती. 12 आमदारांचं निलंबन झालं तेव्हा भाजपसोबत बोलणी सुरु होती. नारायण राणेंचा त्याचवेळी केंद्रात समावेश झाला. राणे केंद्रात गेल्याचं ठाकरेंना आवडलं नाही आणि बोलणी रखडली, असं केसरकर म्हणाले होते.
तसेच आदित्य ठाकरेंबद्दल जे बोललं जात आणि वस्तुस्थिती यामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. ही वस्तुस्थिती आहे की सुशातसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये नारायण राणे यांचा मोठा वाटा होता. ठाकरे कुटुंबियांवर आमच्यासारखे लोक जे प्रेम करतात ते यामुळं दुखावले गेले होते. भाजपच्या अनेक ज्य़ेष्ठ नेत्यांचे माझे जवळचे संबंध आहेत. त्यामुळं मी त्यांना विचारलं होतं की, तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही कसा वापरु देता. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की, आमच्या बहुतांश आमदारांचा अशा प्रकारच्या बदनामीला विरोध आहे, असंही ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Deepika Padukone | “… तेव्हा सतत आत्महत्येचे विचार यायचे”; दीपिकाने सांगितली डिप्रेशनची कहाणी
- Bhandara | महाराष्ट्र हादरला; महिलेवर सामूहिक बलात्कार, रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात अन् विवस्त्र आढळली
- Corona | सण समारंभाच्या काळात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
- CWG 2022 : मराठवाड्याच्या ARMY मॅनची ऐतिहासिक कामगिरी! स्टीपलचेस शर्यतीत रौप्य पदकाची कमाई
- Eknath Shinde । स्वतःचा शिवसेना तर शिवसेनेचा उल्लेख ‘उद्धव ठाकरे’ गट; शिंदेंचं ट्विट चर्चेत
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<