मुख्यमंत्री साहेब ! मोदींना सांगा ते विदर्भात सुध्दा समुद्र आणतील-उद्धव ठाकरे

cm and uadhav thakare

नाशिक: मुख्यमंत्री साहेब! मोदींना सांगा ते विदर्भात सुध्दा समुद्र आणतील. असा टोला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

‘नाणार प्रकल्पाचा विषय शिवसेनेसाठी संपला असून हा प्रकल्प विदर्भात घेऊन जा, देशात अनेक ठिकाणी जेथे समुद्र नाही तेथे सुद्धा तेल रिफायनरी आहेत’, असे ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना नानार प्रकल्पावरून सुनावले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भात समुद्र नसल्यामुळे तिथे नानार प्रकल्प नेता येणार नाही. असे सांगितले होते. यावर उद्धव ठाकरे म्हणाले त्यांनी हे मोदींना सांगावे ते विदर्भात सुध्दा समुद्र आणतील. आता रजनीकांत सुध्दा मोदींना घाबरतो, अशी मिश्कील टिप्पणी केली.
उद्धव ठाकरे उत्तर महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघाचा आढवा घेण्यासाठी नाशिक दौर्यावर आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हाणाले. “मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या पोकळ गप्पा मारण्याऐवजी ठोस योजना राबवाव्या, भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी माझी भेट घेऊन हा प्रकल्प विदर्भात होऊ शकतो, हे अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. देशमुख यांना मुख्यमंत्र्यांपेक्षा माझ्यावर अधिक विश्वास वाटतो असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांची एकदा शाळा घ्यावी” असे ठाकरे म्हणाले