सिनेटच्या निवडणूकीत मुख्यमंत्र्यांचे बंधू प्रसेनजीत फडणवीस यांची विजयासाठी कडवी झुंज

prasanjit fadnvis

टीम महाराष्ट्र देशा –  सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत अर्थात सिनेटची निवडणूक यंदा चुरशीची ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत यंदा निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे यंदाच्या सिनेट निवडणुकीला वेगळेच राजकीय वजन प्राप्त झाले होते. सुरुवातीला प्रसेनजीत यांचा विजय सहज होईल असे चित्र निर्माण झाले होते पण प्रसेनजीत यांना नंतर मात्र निवडणूक जड जाऊ लागली.खुल्या गटातील शेवटच्या ५ जागेवर १२ व्या फेरीनंतर ते विजयी झाले.

सोमवारी सकाळी ८ वाजता सुरु झालेल्या मतमोजणीचे अंतिम निकाल मंगळवारी पहाटे ३ वाजता जाहीर झाले. विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पदवीधरच्या १० तर व्यवस्थापन प्रतिनिधींच्या ६ जागांसाठी निवडणूक पार पडली.

माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व्यवस्थापन प्रतिनिधी पदासाठी बिनविरोध निवडून आल्या. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे-पाटील हे व्यवस्थापन प्रतिनिधी पदावर निवडून आले.

मुख्यमंत्र्यांचे बंधू प्रसेनजीत फडणवीस यांनी विद्यापीठ विकास मंच प्रणित एकता पॅनल कडून उमेदवारी दाखल केली होती. ते या निवडणुकीत सहज विजयी होतील असे चित्र निर्माण करण्यात आले असताना प्रत्यक्षात विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना मोठा झगडा करावा लागला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू प्रसेनजीत फडणवीस यांना विजयासाठी बाराव्या फेरी पर्यन्त घाम गाळावा लागल्याने राहिल्याने विद्यापीठ विकास मंचला मोठा धक्का बसला.
फडणवीस पहिल्या फेरीत निवडून येतील त्यामुळे जास्तीची पहिल्या पसंतीची मते दुसऱ्या उमेदवारांना देण्याचे नियोजन मंचाकडून करण्यात आले होते. मात्र पहिल्या फेरीत प्रसेनजीत चौथ्या क्रमांकावर राहिले.

अधिसभा निवडणुक अंतिम निकाल
पदवीधर
1. संतोष ढोरे – खुला गट
2. अनिल विखे- खुला गट
3. तानाजी वाघ – खुला गट
4. अभिषेक बोके – खुला गट
5. प्रसेनजीत फडणवीस – खुला गट
राखीव गट :
6. दादासाहेब शिनलकर – ओबीसी
7. बागेश्री मंठाळकर – महिला राखीव
8. विश्वनाथ पाडवी – ST राखीव
9. शशिकांत तिकोटे – SC राखीव
10. विजय सोनावणे – NT राखीव
व्यवस्थापन प्रतिनिधी
विजयी उमेदवार
1. सुनेत्रा पवार – बिनविरोध
2 सोमनाथ पाटील
3. श्यामकांत देशमुख
4. संदीप कदम
5. राजेंद्र विखे-पाटील