आजपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर 

मुंबई : आजपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर येत आहेत. रायगड, रत्नागिरी आणि त्यानंतर ते सिंधुदुर्गला जाणार आहेत. सकाळी रायगड दौऱ्यानंतर ते रत्नागिरील्या गणपतीपुळे इथे दाखल होणार आहेत. गणपतीपुळेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुरुवातीला श्रींचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर विकास आराखड्यातील प्रमुख कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

या कोकण दौर्यामध्ये उद्धव ठाकरे रत्नागिरी मधील नाणार रिफायनरी प्रकल्पासोबतच महत्त्वाच्या विकासप्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. रायगड,रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांना ते भेट देणार आहेत. दरम्यान नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला होता. शिवसेनेही त्यांना पाठिंबा देत प्रकल्पाविरोधी भूमिका घेतली होती. मात्र आता पुढील विकासप्रकल्पासाठी आज मुख्यमंत्री स्थानिकांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

Loading...

तसेच दुपारी 12च्या सुमारास उद्धव ठाकरे गणपतीपुळे पर्यटन विकासासाठी मंजूर झालेल्या 102 कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळालेल्या प्रमुख विकासकामांचे भूमीपूजन करणार आहेत. दरम्यान त्यानंतर आज दक्षिणेतील काशी समजली जाणार्या आंगणेवाडी जत्रेला नेते आणि पदाधिकार्यांसोबत जाऊन भराडी देवीचं दर्शन घेणार आहे.

दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये कोकण आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर रिफायनरीची माहिती देणारी जाहिरात आल्याने शिवसेनेची भूमिका बदलली की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या दौऱ्यात याबाबत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका