भाजपसोबत युतीबाबत मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान, तर मोदींना शुभेच्छा देताना म्हणाले…

uddhav thackeray and narendra modi

औरंगाबाद : आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

यासोबतच मुख्यमंत्री ठाकरे यांनी या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत अनेक सूचक विधाने करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा देखील दिल्या. ‘पंतप्रधानांना ट्विटरवरुन वगैरे शुभेच्छा दिल्याचं आहेत. मात्र, माझ्या-शिवसेनेकडून व्यक्तिगत आणि सर्व सहकाऱ्यांच्यावतीने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांना निरोगी, आनंदी, दीर्घायुष्य लाभो अशा मनापासून शुभेच्छा देतो. केवळ बोलायचं म्हणून मी बोलत नाही. त्यांना मनापासून शुभेच्छा देतोय,’ असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं.

अन् ठाकरे म्हणाले, ‘येणारा काळच काय ते ठरवेल’

‘मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी,’ असं विधान करत ठाकरेंनी दानवे यांच्याकडे पाहिले. यामुळे भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चर्चांना उधाण आलं आहे. येणारा काळच काय ते ठरवेल, असं सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या