सिडको भूखंड व्यवहाराला मुख्यमंत्र्यांची स्थगिती?

नागपूर : मुंबईतील सिडको जमिनीच्या व्यवहारामध्ये भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप करत, पावसाळी अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवसापासून विरोधकांचा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान विरोधक ज्या जमीन घोटाळ्यावरून मुख्यमंत्र्यांवर आरोप करत आहेत. त्या नवी मुंबईतील सिडको जमीन व्यवहाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचं वृत्त आहे.

नवी मुंबईतील सिडको येथील जमिनीच्या व्यवहारावरून कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सिडकोमधील १७६७ कोटी रुपये किमतीच्या 24 एकर जमिनीचा अवघ्या तीन कोटी रुपयांना व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

या घोटाळ्यात खुद्द मुख्यमंत्र्यांचे कार्यालयाच गुंतल्याचा आरोप करण्यात येत आहे. सिडकोची जमीन हि नगरविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल होत.

भाजपा ठोकणार काँग्रेसवर 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा