‘भास्कर जाधवांच्या मगरूरीवर मुख्यमंत्र्यांची चुप्पी, पण ध्यानात ठेवा…’

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या ठिकाणी रविवारी पाहणी दौरा केला. या दरम्यान बाजारपेठेत एक महिला पुरामुळे नुकसान झाल्याचे ओरडून मुख्यमंत्र्यांना सांगत होती. ‘तुम्ही काही पण करा, आमदार खासदार यांचा एक महिन्याचा पगार फिरवा पण आम्हाला नुकसान भरपाई द्या’ असे ही महिला ओरडून मुख्यमंत्र्यांना सांगत होती.या महिलेला शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच हातवारे करत तसेच मोठ्याआवाजात प्रतिउत्तर दिले. त्यामुळे त्यांनी केलेल्या अरेरावीवरून भाजपचे प्रवक्ते तसेच विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे.

पूरग्रस्त महिलेला भास्कर जाधव यांनी मोठ्या आवाजात तसेच, हातवारे करत ‘आमदार ,खासदार पाच महिन्याचा पगार देतील ,त्याने काही होणार नाही… तुझा मुलगा कुठे .. आईला समजाव’ अश्या शब्दात उत्तर दिले. त्यामुळे या दौऱ्यात भास्कर जाधव यांचीच चर्चा अधिक झाली. भास्कर जाधव बोलत असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मात्र चुप्पी साधली. यावरून ‘मुख्यमंत्र्यांचा‘पालखी सोहळा’पूरग्रस्तांच्या दारी असे म्हणत भास्कर जाधवांच्या मगरूरीवर मुख्यमंत्र्यांनी घेतलेली चुप्पी बरोबर नाही. पण ध्यानात ठेवा हा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही’ असा इशारा देत गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाना साधला आहे.

चिपळूण या ठिकाणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘तुम्ही काळजी करू नका,तुम्हाला नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सरकारची आहे.’ असे आश्वासन पूरग्रस्तांना दिले आहे. मात्र भास्कर जाधव यांच्या वागण्यावरून आता भाजपकडून शिवसेनेवर टीका केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या