भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच; आता कट्टर विरोधक नारायण राणे म्हणाले…

narayan rane vs uddhav thackeray

मुंबई : ‘मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी,’ असं विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहिले. यासोबतच, येणारा काळच काय ते ठरवेल, असं सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यामुळे भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून आता विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राणेंच्या आक्षेपार्ह विधानामुळे शिवसेना-भाजप यांच्यात गंभीर वाद निर्माण झाला होता. आता अवघ्या काही दिवसातच दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे संकेत मिळत असल्याने नारायण राणे काय मत मांडणार याकडे राजकीय क्षेत्राचं लक्ष्य लागलं होतं.

‘मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे हे मी कसं सांगणार? मी ज्योतिषी नाही. त्यांना आमच्यासोबत यायचं असेल तर त्यांनी ‘उद्याचे सहकारी’ असा शब्दप्रयोग करायला हवा होता. त्यांनी स्पष्ट बोलायला हवं. ते तसं बोललेले नाहीत. त्यामुळं त्यावर काय बोलणार? नो कमेंट्स,’ अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी माध्यमांना दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या