उस्मानाबाद : बुधवारी मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करण्यात आला आहे. या टि्वटमध्ये धाराशिव – उस्मानाबाद येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न 430 खाटांचे रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
शिवसेनेकडून अनेक वर्षांपासून उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असाच करण्यात येत आहे. आता तर मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर अधिकृत धाराशिव असा उल्लेख केला गेला आहे. या प्रकारामुळे कॉंग्रेसची मात्र गोची झली आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे यातच शहराच्या नामांतराचा मुद्दा गाजत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून संभाजीनगर असा उल्लेख केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध दर्शवला होता. आता ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष यागून आहे.
उदयनराजे भोसले यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराला पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी पुण्याचे संभाजीनगर असे नामांतर करा व औरंगाबादचे नाव औरंगाबादच राहावे अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी आंदोलनही छेडले जाईल असा इशाराही त्यांनी औरंगाबाद येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- वंशवाद ट्विवरून बिग बी झाले ट्रोल
- भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्र्यांना केलेली ‘ती’ विनंती अखेर झाली मान्य
- नेत्यांनी मतदानासाठी ऊसतोड कामगारांसमोर परसले हात
- राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरु; धनंजय मुंडे राजीनामा देण्याच्या तयारीत ?
- १६५ पोल्ट्री फार्म चालकांना सतर्कतेचा इशारा