‘बंगाल पॅटर्नवरील मुख्यमंत्र्यांचे प्रेम उघडकीस आणणार’: नितेश राणेंचं शिवसेनेला आवाहन

‘बंगाल पॅटर्नवरील मुख्यमंत्र्यांचे प्रेम उघडकीस आणणार’: नितेश राणेंचं शिवसेनेला आवाहन

nitesh rane

मुंबई :  महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. मुंबईमध्ये हिंदुत्वाच्या मुद्याने मनसे पाठोपाठ भाजप देखील आघाडी घेतली आहे. यावरून सध्या मोठ्या प्रमाणत आरोप-प्रत्यारोपाचे प्रकार देखील सुरु आहेत. याबाबत आता नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तर यातुन त्यांनी मुंबईतील हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे देखील सांगितले आहे.

नुकत्याच झालेल्या नवरात्र उत्सवात बांगलादेशात थेट दुर्गा देवीच्या मूर्तीची, मंदिराची तोडफोड करण्यात आली.  मंदिरातील पुजाऱ्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर लगेच मुसलमानांनी येथील हिंदूंच्या वस्तीवर हल्ला केला. त्यामुळे येथे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत लिहिले की, ‘जे बांगलादेशात घडले तेच पुढे मुंबईत घडणार आहे. त्यातील मालवणी हा सध्याचा पहिला भाग आहे. अशा प्रकारे मुंबईत अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. आम्ही अशा ठिकाणांना भेटी देणार आहोत, तेथील हिंदूंना पाठिंबा देणार आहोत. येत्या आठवड्यात आम्ही हे कार्य सुरु करणार आहोत. तसेच बंगाल पॅटर्नवरील मुख्यमंत्र्यांचे प्रेम उघडकीस आणणार आहोत’, असल्याचे देखील स्पष्ट सांगितले.

दरम्यान, भाजप व त्यांचे केंद्रातले सरकार कोणत्याही प्रश्नांना सामोरे जात नाहीत. प्रश्न विचारणाऱ्यांना ते खतम करतात. लोकशाही, घटना, कायदा त्यांना मान्य नाही. उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरुन ‘दम मारो दम’ करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरुन स्पष्ट होते.अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून केली होती. यावरच भाजप नेते नितेश राणे यांनी ‘मालकाच्या घरीच ‘गांजाचा बादशाह’असल्यामुळे राऊतांना कमी आणि जास्त प्रतीचा गांजा कसा असतो हे चांगले कळते. गांज्यावर इतके प्रेम बर नाही. अशी खोचक टीका नितेश राणे यांनी ट्वीट करत केली होते.

 

महत्वाच्या बातम्या