मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका- प्रकाश आंबेडकर

chief-ministers-life-risk-claim-prakash-ambedkar-today

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मुंबईत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

संभाजी भिडे यांच्या जवळचा व्यक्ती असलेल्या रावसाहेब पाटील या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना जीवे मारा असं आवाहन करण्यात आलं आहे. ही माहिती पोलिसांना आहे. मात्र त्यांच्यापासून ही माहिती लपवण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ही माहिती पुणे पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पुण्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखांना आहे असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.