fbpx

मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय ‘यांना’ मिळाले आरक्षण

devendra fadnavis

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. अनाथ, निराधारांना शिक्षण आणि शासकीय नोकरीत एक टक्का समांतर आरक्षण देण्यासंबंधी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. अनाथाश्रम सोडल्यानंतर नोकरीमध्ये अडथळे अनाथ मुलांना याचा फायदा होणार आहे.

राज्यसरकारने याबाबत १७ जानेवारीला निर्णय घेतला होता. अनाथ मुलांना संस्थेतील कालावधी संपल्यानंतर रोजगारासाठी धावापड करतांना अने अडचणींना सामोरे जाव लागत. अनाथ मुलांच्या या समस्या ध्यानात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून देऊ, असं आश्वासन दिले होते. त्यानुसार हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला आणि त्याला मंजुरीही देण्यात आली. अनाथ मुलांचा प्रवर्ग निश्चित नसल्यामुळे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती आणि लाभांपासून वंचित रहावं लागत होते.

अनाथ मुलांना आता शासकीय नोकरीतल्या अर्जावर जातीच्या रकान्यांसोबत अनाथ असाही रकाना असेल. ज्यामुळे शासकीय नोकरीत १ टक्के आरक्षण तर मिळेलच, शिवाय अनाथ मुलांसाठी आता जातीची कटकट राहणार नाही.

कोणाला मिळणार या निर्णयाचा लाभ ?

१. बालगृह आणि अन्य अनाथ मुलांपैकी महिला आणि बाल विकास विभागाकडून देण्यात येणारे अनाथ प्रमाणपत्र असणाऱ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार.

२. हे आरक्षण सरकारी सेवेतील नोकऱ्यांसाठीही राहणार असून शिष्यवृत्ती, वसतिगृह, व्यावसायिक  शिक्षणासाठी, शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ती योजनांसाठी लागू

३. ज्याचे आई-वडील, अन्य नातेवाईक यांची कोणतीच माहिती नाही त्यांनाच या आरक्षणाचा लाभ.

2 Comments

Click here to post a comment