एकनाथ खडसेंसोबत एका मंचावर नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी जळगाव दौरा टाळला ?

टीम महाराष्ट्र देशा : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आयोजित पद्मश्री डॉ.आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण समारंभ जैन हिल्स येथे आकाश मैदानात आज ( शुक्रवार ३० मार्च ) रोजी होता याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते तर अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार हे होते याच मंचावर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे सुद्धा उपस्थित राहणार होते.

Loading...

मात्र, मुख्यमंत्र्यांनी आजचा जळगाव दौरा अचानक रद्द केला आहे , एकनाथ खडसेंसोबत एका मंचावर नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी दौरा टाळल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली जात आहे. दरम्यान दिल्लीहून मुंबईला रात्री उशिरा पोहोचलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांचा जळगाव दौरा ऐनवेळी रद्द झाला असल्याच सांगण्यात येत आहे.Loading…


Loading…

Loading...