मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा!

udhav thackrey

औरंगाबाद : १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री औरंगाबादेत येत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा अडविण्यात येईल. असा ईशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झालेला दिसून येत आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद शहरात येणार आहेत. त्यावेळी मुख्यमंञी ठाकरेंचा ताफा गणिमी काव्याने आडवुन मराठा आरक्षण व समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जाब विचारणार आहे. असा इशाराच थेट मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे.  सरकार कोणतेही असो मराठा समाजाची नेहमी भुलथापा देऊन फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

यापुढे राज्यातील कोणत्याही शहरात किंवा गावात मंत्र्यांसह आमदार, खासदारांना बंदी घालण्याची भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाने घेतली आहे. मराठा आरक्षण असो किंवा समाजातील प्रलंबित मागण्या असो यावर अद्यापही सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने समाज यापुढे आक्रमक होणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील, अप्पासाहेब कुढेकर पाटील, किरण काळे पाटील, मनोज मुरदारे, राहुल पाटील, रवि शिसोदे आदींनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या