मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त ऑडिओ क्लीप : वाचा राजकीय प्रतिक्रिया

पालघर – भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत असून, भाजप आणि शिवसेनेसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपकडून काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित हे उमेदवार देण्यात आले आहेत. तर शिवसेनेकडून भाजपमधून शिवसेनेमध्ये गेलेले श्रीनिवास वनगा हे उमेदवार आहेत. दरम्यान जसजशी निवडणूक जवळ येत आहे तशी प्रचारातली रंगत वाढत असून, आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगतांना दिसत आहे.

दरम्यान शुक्रवारी याठिकाणी झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप उघड केलीये. या क्लीपच्या सतत्येविषयी अद्याप पडताळणी करण्यात आलेली नाही. मात्र, या क्लीपमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हटलं आहे या क्लीपमध्ये?

देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना पालघरची निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्याची सूचना देत आहेत. आपल्याला प्रचंड मोठी लढाई लढायची असून कोणी आपल्या अस्तित्वाला आव्हान देत असेल, विश्वासघात करत असेल तर त्याला तसेच उत्तर दिले पाहिजे. आपल्याला मोठा अॅटॅक केला पाहिजे. कोणी दादागिरी करत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या. मी तुमच्यामागे ताकदीने आणि खंबीरपणे उभा आहे. ‘अरे ला कारे’च करायचं.. ‘अरे ला कारे’ मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी या क्लीपमध्ये म्हटले आहे.

राजकीय प्रतिक्रिया 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पालघरमधल्या कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचा दावा खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची भाषा वापरणे हे त्यांना शोभणारे नाही. हे त्यांच्या पदाला काळीमा फासण्यासारखे आहे. – खासदार संजय राऊत

पराभव समोर दिसू लागल्यामुळे सैरभैर झालेल्या शिवसेनेकडून अर्धवट आणि एडिटेड आॅडिओ क्लिप दाखवली जात आहे. या संदर्भात उद्या निवडणूक आयोगाकडे भाजप तक्रार करणार आहेच,त्याबरोबर खरी क्लिपही उद्या जाहीर करणार – गिरीश महाजन, भाजप नेते

 

7 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...