fbpx

मुख्यमंत्र्यानकडून अर्थसंकल्पाचे कौतुक

टीम महारष्ट्र देशा : लोकसभेमध्ये आज भाजप सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पातून किसान , जवान , मध्यम वर्गीय माणूस, यांना केंद्रस्थानी ठेवले आहे. तसेच या अर्थसंकल्पाचे सगळ्या सामाजिक स्तरातून स्वागत केले जात आहे. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील या अर्थसंकल्पाबाबत कौतुकास्पद प्रतिक्रिया दिली आहे.

या अर्थसंकल्पातून देशातील सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवले आहे. केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा समाजातील सर्व घटकांचे जीवनमान उंचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्नांचा जाहीरनामाच आहे. अस मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल आहे.

या अर्थसंकल्पात असंघटित क्षेत्रातील कामगारांना तीन हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या स्थापनेमुळे दुधाचे उत्पादन वाढण्यासोबतच शेतकऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. आयकर उत्पन्नाची मर्यादा पाच लाखापर्यंत वाढवल्यामुळे नोकरदारवर्गाला मोठा दिलासा मिळाला असून देशाच्या विकासात योगदान देतानाच ते अधिकाधिक बचतही करु शकतील. प्रसुती रजेचा कालावधी 26 आठवडे करण्याच्या निर्णयातून माता आणि बालसंगोपनाबाबतची सरकारची कटिबद्धता सिद्ध झाली आहे. यासाऱ्या हितकारी निर्णयांमुळे हे अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच ठरणार आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.