मुंबई : भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर उदयनराजे हे पहिल्यांदाच शरद पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं होतं. शरद पवारांनी मराठा आरक्षणप्रश्नी लक्ष घालावं, अशी मागणी त्यांनी केली होती. आता, उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. सुमारे अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यानंतर उदयनराजेंनी भेटीमागचं कारण स्पष्ट केलं आहे. दयनराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत मराठा आरक्षणाप्रश्नी एक निवेदन दिलं आहे.
‘राज्य सरकारने मराठा आरक्षणाप्रकरणी दोन अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. त्यातील एका अर्जात सर्व राज्य सरकारना प्रतिवादी करण्याची विनंती केली आहे. तर, दुसऱ्या अर्जात ११ न्यायाधीशांचे खंडपीठ नेमण्याची मागणी करण्याच्या तयारीत आहे. जर अशा पद्धतीने खटल्यांचे कामकाज सुरु राहिले तर इतर खटल्यांप्रमाणे ही केसपण प्रलंबित राहील,’ अशी चिंता उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.
यासोबतच, ‘केस प्रलंबित राहिल्यास मराठा समाजात मोठा असंतोष निर्माण होईल. आजही समाजात या दिरंगाईची खदखद वेगवेगळ्या रुपाने बाहेर येताना दिसत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की या प्रकरणात तुम्ही स्वतः लक्ष घालावे. तसेच, मराठा आरक्षणाच्या केसमध्ये कोणत्याही प्रकारचा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करु नये. तशा सूचना राज्य सरकारला देवून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गीलावावा,’ अशी मागणी देखील उदयनराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वतंत्र भारतात प्रथमच ज्या महिलेला फाशी दिली जाणार आहे तिने जाणून घ्या काय केलाय गुन्हा !
- भले शाब्बास! औरंगाबादने ‘या’ गोष्टीत मोदींच्या वाराणसी व अहमदाबादलाही मागे टाकले
- आम्हीच श्रीरामांचे वंशज, भाजपला श्रीरामचंद्रांशी काही घेणं देणं नाही – राकेश टिकैत
- भाजपवर बांग्लादेशी अल्पसंख्यांकांना पद देण्याची नामुष्की आली?
- ‘राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही’