सुप्रिया सुळेंनी रखडलेल्या शिक्षक भरतीची मुख्यमंत्र्यांना करून दिली आठवण

पुणे: राज्यात गेल्या ८ वर्षापासून रखडलेल्या शिक्षक भरतीमुळे हजारो युवक गुणवत्ता असूनही बेरोजगार आहेत. त्यामुळे याविरोधात सर्व विद्यार्थी काल पासून पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालायासोर उपोषणाला बसले आहेत.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षक भरतीच्या घोळावरून मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले आहे. “शिक्षकभरती रखडली आहे. खेड्यापाड्यातील हजारो बेरोजगार मुलं मोठ्या अपेक्षेने वाट पाहत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शिक्षकभरती चा कार्यक्रम जाहिर केल्यास त्यांना दिलासा मिळेल. शिक्षकभरतीसाठी ही मुले संघर्ष करीत आहेत”. त्याची आठवण सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आहे.

उपोषणाला बसलेल्या भावी शिक्षकांच्या मागण्या

  • बिंदुनामावली अनियमिततेची राज्यभर चौकशी करने
  • खासगी अनुदानित संस्था अधिनियम बदल
  • बोगस शिक्षकांवर कारवाई करने
  • संचमान्यता जाहिर करने