मुख्यमंत्र्यांनी घेतले शिवछत्रपतींचे दर्शन ; सिंधुदुर्ग किल्ल्याची केली पाहणी

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊन किल्ल्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन शिवछत्रपतींचे दर्शन घेतले. किल्ल्यावरील भवानी मातेच्या मंदिरातील भवानी मातेचेही त्यांनी दर्शन घेतले.

मुख्यमंत्री ठाकरे हे कालपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. काल सिंधुदुर्ग जिल्ह्याची तर मंगळवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्याची आढावा बैठक त्यांनी घेतली. पर्यटन विकासाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग किल्ल्याला त्यांनी भेट देऊन पाहणी केली.

Loading...

या पाहणीवेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत रत्नागिरीचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मुख्य सचिव अजोय मेहता, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, उप विभागीय अधिकारी वैशाली राजमाने, वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच भाई ढोके यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान दुसरीकडे शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात 10 देशांचे भारतातील राजदूत प्रमुख पाहुणे असणार आहेत, अशी माहिती खासदार संभाजी छत्रपती यांनी दिली आहे. बीव्हीजी समुहाचे प्रमुख तथा प्रसिध्द उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना यावर्षीच्या सोहळ्यामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार संभाजी छत्रपती यांच्या 49, लोधी इस्टेट या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. दिल्ली येथील कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात 19 फेब्रुवारी 2020 रोजी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांच्या आयोजनांसह शिवजयंती सोहळा साजरा होणार असून 10 देशांचे राजदूत या सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत स्थित पोलंड, बुल्गेरीया, स्पेन, रोमानिया, चीन, इजिप्त, कॅनडा, ट्युनिशिया, सायप्रस आणि इस्त्रायल या दहा देशांच्या राजदूतांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यास होकार दर्शविला असल्याचे त्यांनी सांगितले. पोलंड आणि बुल्गेरीयाचे राजदूत या सोहळ्याला संबोधित करणार असून पोलंडचे राजदूत खास हिंदीतून संबोधन करतील असेही त्यांनी सांगितले. अजूनही काही राजदुतांकडून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत संमती मिळू शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका