मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज पुणे दौरा

Uddhav Thakrey Pune

पुणे: राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कोरोनाने मुंबई पाठोपाठ पुण्यातही कहर घातला असून पुण्यातील आकडे हि अजून आटोक्यात नसल्याचे वाढत्या रुग्णसंख्येवरून समजत आहे. आता केंद्राचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे स्वतः लक्ष घालून येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लक्ष घालणार आहेत. तर, मुख्यमंत्री देखील याच पार्श्वभूमीवर आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत.

मुख्यमंत्री आज सकाळी नऊ वाजता पुणे दौऱ्याला निघतील. कोरोनाविषयक उपयाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज दिवसभर पुण्यात असतील. यावेळी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत कोरोनाविषयक बैठकाही घेणार आहेत. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी 12.15 वाजता त्यांची कोरोना साथीसंदर्भात सर्व लोकप्रतिनिधीसमवेत बैठक होईल.

१५ लाखांचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रदेश काँग्रेस तर्फे अभिनंदन : सचिन सावंत

त्यानंतर दुपारी 2.30 वाजता त्यांची याच संदर्भात सर्व प्रशासकीय यंत्रणांसमवेत बैठक होईल. या बैठकांना त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, मुख्य सचिव संजय कुमार तसंच इतर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारीही उपस्थित असतील. मग संध्याकाळी पाच वाजता ते मुंबईकडे रवाना होतील.

‘गाफील न राहता कोरोनाचे संकट आटोक्यात येत नाही तोपर्यंत सावध रहा’

राज्यावर कोरोनाचं संकट असूनही मुख्यमंत्री मातोश्रीचा उंबरठा ओलांडत नसल्याची टीका विरोधकांकडून वारंवार होत आहे. शिवाय पुण्यावर अन्याय होत असल्याची टीकाही विरोधक करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे. त्यांच्या या भेटीमुळे या लढाईला निश्चित बळ मिळेल, असा विश्वास देखील उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी म्हणाले की, पुण्यात ‘कोरोना’च्या चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्यामुळेच रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे.

‘काहींना या परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नसेलही. त्यांनी आणखी प्रयत्न करावेत…यश तुमचेच असेल’

पुणे जिल्ह्यात एकूण ७४,००० च्यावर कोरोना रुग्ण आढळले असून १७९२ मृत्यू झाले आहेत. यात, पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वाढती रुग्ण संख्या हि चिंतेची बाब बनली असून मधल्या काळात पुन्हा १० दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला होता.