उद्धव ठाकरे उतरणार ‘ग्राउंडवर’, चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाचा करणार दौरा

udhav thackeray

मुंबई : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अलिबाग तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात शेतीमाल व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. आता चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. याच नुकसानाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट अलिबागला जाणार आहेत.

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी दौरा करणार आहेत. ते मुंबईहून रोरो बोटीने अलिबागला जाणार असून अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील घेणार आहेत.

चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणाला विशेष आर्थिक पॅकेज द्या – भाजपा

दरम्यान, जिल्ह्यात चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या जागा, शेती, घरे, बागा आदींचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम शासकीय स्तरावर लवकारात लवकर पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करावा व तातडीने शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचविण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

तर दुसरीकडे ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाची संवाद साधून जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

‘मिशन बिगिन अगेन’मध्ये ठाकरे सरकारने दिली अजून शिथिलता, वाचा काय होणार सुरु…